
नांदेड, 29 जून (हिं.स.) : केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी त्यांच्या नांदेड दौऱ्यादरम्यान आज प्रसिद्ध श्री हजूर साहिब सचखंड गुरुद्वारास भेट देऊन दर्शन घेतले. या वेळी गुरुद्वारातील पुजाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या सोबत कुटुंबीयही उपस्थित होते.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, जिल्हा कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत आणि एमआयडीसी व्यवस्थापक गजानन कपाळे यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.
दर्शनानंतर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारात लंगर प्रसादाचा लाभ घेत सेवा कार्यात सहभाग नोंदवला. गुरुद्वारातील शांतता, सेवा परंपरा आणि आध्यात्मिक वातावरणाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.दौऱ्यादरम्यान परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis