
नांदेड, 29 जून (हिं.स.)।नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक २०२६-२०३१ च्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ ता.बिलोली येथे आयोजित करण्यात आलेल्या मतदार व कार्यकर्त्यांच्या बैठकीस मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद अत्यंत प्रेरणादायी ठरला असे महिला नेत्या डॉक्टर मीनल खतगावकर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या,या बैठकीत उपस्थित सर्व मतदार, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मान्यवरांनी दाखविलेला विश्वास व पाठिंबा ही माझी सर्वात मोठी ताकद आहे.
खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहेबांचे यांनी अनेक वर्ष सहकार चळवळ सुरू ठेवली आज त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची संधी मिळाली ही बाब माझ्यासाठी अभिमानाची आहे.आज सर्वांशी नाते जपत शेतकरी, सभासद, महिला, युवक आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा माझा दृढ संकल्प आहे.आगामी निवडणुकीत सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने पुढे यावे, असे आवाहन करते. रामतीर्थ येथे झालेल्या या बैठकीतून संघटनात्मक बळ, सकारात्मक ऊर्जा आणि विजयाचा दृढ विश्वास निर्माण झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis