तख्त सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब गुरुद्वारा अधिनियम, १९५६ हा कायदा
नांदेड, 29 जून (हिं.स.)। शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची नांदेडचे शिवसेना आमदार आनंद बोंढारकर यांनी विधानभवन येथे भेट घेऊन नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब गुरुद्वारा अधिनियम, १९५६ हा का
अ


नांदेड, 29 जून (हिं.स.)।

शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची नांदेडचे शिवसेना आमदार आनंद बोंढारकर यांनी विधानभवन येथे भेट घेऊन नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब गुरुद्वारा अधिनियम, १९५६ हा कायदा कायम ठेवण्याबाबत निवेदन सादर केले..

यावेळी कोणतेही बदल करावयाचे असल्यास ते स्थानिक शीख समाज, धार्मिक संस्था, तज्ज्ञ तसेच लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी साहेबांकडे केली.

तख्त सचखंड श्री हजूर साहिब हे जगभरातील शीख समाजाचे अत्यंत पवित्र श्रद्धास्थान असून नांदेड व मराठवाड्यातील स्थानिक शीख समाजाचे या संस्थेशी अनेक पिढ्यांपासून भावनिक, धार्मिक आणि ऐतिहासिक नाते आहे. त्यामुळे गुरुद्वारा अधिनियम, १९५६ रद्द करण्याच्या निर्णयाला पुनर्विचारासाठी स्थगिती देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande