पोस्टाचा नवीन चिपळूण विभाग १ जुलैपासून कार्यान्वित
रत्नागिरी, 29 जून (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्यातील पोस्टल ग्राहकांसाठी आणि प्रशासकीय कामांसाठी पोस्टाचा स्वतंत्र चिपळूण विभाग बुधवार १ जुलै २०२६ पासून नव्याने कार्यरत होत आहे. या नवीन चिपळूण विभागाचा प्रारंभ १ जुलै रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्य
पोस्टाचा नवीन चिपळूण विभाग १ जुलैपासून कार्यान्वित


रत्नागिरी, 29 जून (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्यातील पोस्टल ग्राहकांसाठी आणि प्रशासकीय कामांसाठी पोस्टाचा स्वतंत्र चिपळूण विभाग बुधवार १ जुलै २०२६ पासून नव्याने कार्यरत होत आहे.

या नवीन चिपळूण विभागाचा प्रारंभ १ जुलै रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी चिपळूण, दापोली, खेड, गुहागर आणि मंडणगड या उत्तर रत्नागिरीतील पाच तालुक्यांमधील सर्व डाकघरे आता नव्याने निर्माण होणाऱ्या चिपळूण विभागाला जोडण्यात येणार आहेत.

सध्याच्या रत्नागिरी डाक विभागाचा विस्तार राजापूरपासून वेश्वीपर्यंत अत्यंत दुर्गम भागांपर्यंत पसरलेला आहे. या अवाढव्य विस्तारामुळे प्रशासकीय कामे करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ग्राहकांना विभागीय स्तरावरील कामांसाठी रत्नागिरी जिल्हा मुख्यालयात यावे लागत असे. आता चिपळूण विभाग स्वतंत्र झाल्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande