अमरावतीत शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली; वह्यांचे दर वाढले
अमरावती, 29 जून (हिं.स.)। जिल्हाभरातील शाळांची घंटा येत्या ३० जून रोजी वाजणार असून, नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी विद्यार्थी आणि पालकांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. दप्तर, वह्या, पुस्तके, कंम्पास पेटी, बूट, रेनकोट आणि छत्री यांसारख्या शालेय स
यंदा वह्यांच्या किमतीमध्ये १० टक्क्यांनी वाढ शाळांमधून पुस्तके मिळत असल्याने नवीन पुस्तकांचा व्यवसाय ठप्प


अमरावती, 29 जून (हिं.स.)। जिल्हाभरातील शाळांची घंटा येत्या ३० जून रोजी वाजणार असून, नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी विद्यार्थी आणि पालकांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. दप्तर, वह्या, पुस्तके, कंम्पास पेटी, बूट, रेनकोट आणि छत्री यांसारख्या शालेय साहित्याने बाजारपेठ पूर्णपणे फुलली आहे. शाळा सुरू होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने अमरावती शहरातील मोची गल्ली, गांधी चौक, राजकमल, जयस्तंभ, चित्रा, इतवारा, श्याम चौक आणि अन्य बाजार परिसरात खरेदीसाठी पालकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे.

आपल्या लाडक्या मित्रांना पुन्हा भेटण्याच्या आणि नवीन साहित्यासह शाळेत जाण्याच्या उत्सुकतेपोटी मुलांमध्ये कमालीचा उत्साह आहे. यावर्षी पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे कागदाचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून छपाईचा खर्च वाढल्याने पाठ्यपुस्तके व वह्यांच्या किमतीत १० ते १५ टक्के दरवाढ झाली, असे शहरातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांनी सांगितले.

पूर्वी ५०० ते ५२० रुपये डझनाने मिळणाऱ्या वह्या आता थेट ६०० रुपयांवर गेल्या आहेत. मात्र, शाळांच्या बॅग व दप्तरांच्या किमती गतवर्षी इतक्याच स्थिर आहेत. केजीपासून ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी २५० रुपयांपासून ते ७०० रुपयांपर्यंतची दप्तरे आमच्याकडे उपलब्ध आहेत. शाळा सुरू होण्यास दोन दिवस उरले असल्याने खरेदीसाठी गर्दी होत आहे. असे विक्रेते गजानन देशमुख यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande