अमरावती जिल्ह्यातील अनेक हॉटेलातून पनीर, चीज अन् खवाही गायब
अमरावती, 29 जून (हिं.स.)आपण काय खातोय, याचा विचार आता सामान्य लोकही करू लागले आहेत. हा विचार करायला अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भाग पाडले आहे. दुग्धजन्य पदार्थ उत्पादकांनी तर त्यांची धास्तीच घेतली आहे. त्यामुळे स्वस्त दरा
जिल्ह्यातील अनेक हॉटेलातून पनीर, चीज अन् खवाही गायब!


अमरावती, 29 जून (हिं.स.)आपण काय खातोय, याचा विचार आता सामान्य लोकही करू लागले आहेत. हा विचार करायला अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भाग पाडले आहे. दुग्धजन्य पदार्थ उत्पादकांनी तर त्यांची धास्तीच घेतली आहे. त्यामुळे स्वस्त दरातील पनीर, खवा, क्रिम उत्पादकांनी अनिश्चित काळासाठी ‘दुकान बंद’ केले आहे. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या हॉटेल, ढाबेवाल्यांच्या मेनू कार्डमधून हे पदार्थच गायब झाले आहेत.

दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये लोणी, तूप, पनीर, खवा याशिवाय खाद्यतेल, मसाले, मध, डाळी आणि केशर यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असते. उदाहरणादाखल चीजमधील भेसळीतून होणारे अर्थकारण समजून घ्यायचे झाल्यास, अॅनालॉग चीजची किंमत ही पारंपरिक, शुद्ध चीजच्या तुलनेत तीस ते साठ टक्के कमी असते. मात्र, हे पदार्थ गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकतात. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पंचवीस मे रोजी ‘एफडीए’चा पदभार स्वीकारला. त्यानंतर भेसळखोर, गुटखा माफिया आणि बनावट औषधांच्या विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अन्नात विष कालवणार्!यांचे धाबे दणाणले. त्याचा थेट परिणाम म्हणून बाजारात अशा पदार्थांचा तुटवडा आहे किंवा उत्पादन बंद आहे.

‘एफडीए’च्या कारवाईच्या भीतीने अनेकांनी तर व्यवसाय बंद ठेवले आहेत. हॉटेल चालकांनी तर चीज, पनीर आणि खवा यांसारख्या पदार्थांना बॅनच केल्याचे पहावयास मिळत आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग स्वातंत्र्यापासून कार्यरत आहे. अपवाद वगळता अनेक अधिकारी तोडपाण्यासाठीच छापा टाकतात, असा या खात्याचा नाव लौकिक आहे. काही अधिकारी दक्ष असून त्यांनी यापूर्वीही भेसळयुक्त अन्नाचे घातक परिणाम पचनसंस्थेपासून सुरू होतात. कारण पचनसंस्था ही दूषित पदार्थांपासून शरीराचे संरक्षण करीत असते. भेसळयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने यकृत आणि पचनसंस्थेवर दूरगामी व विपरीत परिणाम होऊ शकतात. नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ‘नाम ही काफी है...’ चा अनुभव येऊ लागला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande