
पुणे, 29 जून (हिं.स.)। राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, आत्मविश्वास वाढवणे आणि शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचा उद्देशाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' जाहीर केली आहे, याअनुषंगाने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ४१ थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे, अशी माहिती सहकारी संस्था पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी दिली आहे.
सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण कार्यालयाच्या वतीने या योजनेची प्रभावी, पारदर्शक अंमलबजावणी आणि वेळेत लाभ देण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला कर्जदारांचा तपशील पोटर्लवर माहिती अपलोड करण्याचे आवाहन केले असता बॅकेच्यावतीने संपूर्ण कर्जदार खातेदाराची माहिती पोटर्लवर अपलोड केली आहे. त्याचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे: सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण कार्यालयाच्यावतीने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला शेतकऱ्यांच्या तपशील पोटर्लवर माहिती अपलोड करण्याचे आवाहन केले असता बॅकेच्यावतीने संपूर्ण कर्जदार खातेदाराची माहिती पोटर्लवर अपलोड केली आहे.
त्याचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे: आंबेगाव तालुक्यातील ३ हजार ३९०, बारामती १३ हजार ७२८, भोर ७ हजार २४२, दौंड १९ हजार ५६२, हवेली ४ हजार १६८, इंदापूर १८ हजार ८१८, जून्नर ७ हजार ७७८, खेड ७ हजार ८५३, मावळ ५ हजार १७२, मुळशी २ हजार ३८७, पुरंदर ७ हजार ९०३, शिरुर ८ हजार ४५२ आणि वेल्हा १ हजार ८८८ याप्रमाणे माहिती अपलोड केली आहे, अशी माहिती जगताप यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु