पुणे ते सोलापूर महामार्गावर वाहतुकीत बदल
पुणे, 29 जून (हिं.स.)पुणे ते सोलापूर महामार्गावरुन थेऊर फाटा ते लोणीकंदकडे जाणारी अवजड वाहतूक थेऊर फाटा रेल्वे उड्डाणपुल दुरुस्तीच्या कामाकरिता केडगाव चौफुला येथून ८ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत वळविण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकार
पुणे ते सोलापूर महामार्गावर वाहतुकीत बदल


पुणे, 29 जून (हिं.स.)पुणे ते सोलापूर महामार्गावरुन थेऊर फाटा ते लोणीकंदकडे जाणारी अवजड वाहतूक थेऊर फाटा रेल्वे उड्डाणपुल दुरुस्तीच्या कामाकरिता केडगाव चौफुला येथून ८ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत वळविण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत. थेऊर फाटा ते लोणीकंदकडे जाणारी अवजड वाहतूक केडगाव-चौफुला-न्हावरे मार्गे तळगाव ढमढेरे, शिरुर या पर्यायी मार्गे वळविण्यात आली आहे, नागरिकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन डुडी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande