राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहिमेचे आयोजन
जळगाव, 29 जून (हिं.स.) | राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव कार्यालया मार्फत दि. २६ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज समान संधी
राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहिमेचे आयोजन


जळगाव, 29 जून (हिं.स.) | राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव कार्यालया मार्फत दि. २६ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज समान संधी केंद्रांच्या माध्यमातून स्वीकारण्यात येणार असून प्राप्त अर्जांवर तात्काळ कार्यवाही करून जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियोजन समितीमार्फत करण्यात आले आहे.याशिवाय जिल्हा जात पडताळणी कार्यालय स्तरावर दि. ३० जून ते २ जुलै २०२६ या कालावधीत त्रुटीपूर्तता मोहिमेचेही आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थी तसेच सीईटीसह विविध पात्रता परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज सादर करून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव श्रीमती एन. एस. रायते यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande