
अमरावती, 29 जून (हिं.स.)
नव्या शैक्षणिक वर्षाला उद्या मंगळवार (ता. ३०) पासून सुरवात होणार आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने प्रवेशोत्सवाची तयारी करण्याचे निर्देश मुख्याध्यापक, शिक्षकांना दिले होते. त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. असे असले तरी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके पडतील, परंतु गणवेश सध्यातरी अधांतरीच म्हणावा लागेल. लोकप्रतिनिधी, अधिकार्!यांच्या शाळा भेटीने विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाला आनंदाची किनार राहणार आहे.
उन्हाळी सुट्ट्या आता संपल्या आहेत. तब्बल अडीच महिन्याची मरगळ झटकून विद्यार्थी मंगळवारी शाळेत येतील. जिल्हा परिषद, नगर पालिका तसेच खासगी, अशा मिळून तीन हजार २०० हून अधिक शाळांची घंटा वाजणार आहे. अतिशय दमदार पद्धतीने नव्या शैक्षणिक वर्षांची सुरवात केल्या जाणार आहे. पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण विभागाने सोळाही पंचायत समितीच्या गटशिणाधिकार्!यांच्या माध्यमातून मुख्याध्यापक, शिक्षकांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. शाळापूर्व तयारीला वेग आला असून, वर्गातील साफसफाईसुद्धा आटोपण्याच्या मार्गावर आहे.
लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या शाळा भेटी
विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस आनंदी वातावरणात जावा, याकरिता लोकप्रतिनिधी तसेच अधिकार्!यांनी शाळा भेटी द्याव्या, असे निर्देश देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने नियोजन केले आहेत. यात प्रामुख्याने आमदार .खासदार,मंत्री ,महापौर शाळांना भेटी देणार असून अधिकारी , इतर लोकप्रतिनिधी तसेच इतर अधिकारी असे मिळून शाळांना प्रत्यक्ष भेटी देण्यात येणार आहे. या भेटीचे संपूर्ण नियोजन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी