छ. संभाजीनगर-शेतकऱ्यांच्या विना अट संपूर्ण कर्जमाफीसाठी आंदोलन
छत्रपती संभाजीनगर, 29 जून (हिं.स.) । छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमाफी मिळावी, या न्याय्य मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या तीव्र आंदोलनात सहभागी होत शेतकऱ्यांच्या हक्क
अ


छत्रपती संभाजीनगर, 29 जून (हिं.स.) । छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमाफी मिळावी, या न्याय्य मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या तीव्र आंदोलनात सहभागी होत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज बुलंद केला. या आंदोलनात खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हर्षवर्धन सपकाळ रोहित पवारयांच्यासह पक्षाचे सर्व नेते, खासदार,आमदार,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी जाचक अटींमुळे लाखो शेतकरी आजही लाभापासून वंचित आहेत. शेतकऱ्यांना फसवणारी ही कागदोपत्री कर्जमाफी आम्हाला मान्य नाही.पंढरपूर येथील अन्नत्याग आंदोलनावेळी दिलेल्या आश्वासनांपासून सरकारने माघार घेतल्याने आता शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. जोपर्यंत राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला विना अट संपूर्ण कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा अखंड सुरू राहील.

--------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande