
अमरावती, 29 जून (हिं.स.) | शहरासह तालुक्यातील घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर लादण्याच्या सक्तीचा तीव्र निषेध करत विज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक देऊन स्मार्ट मीटर लावण्यास जबरदस्ती केल्यास परिणाम भोगावे लागतील असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांनी निवेदन सादर करून दिला.
राज्य शासनाने जून २०२४ मध्ये घरगुती ग्राहकांसाठी स्मार्ट मीटरची अंमलबजावणी स्थगित केली होती. असे असताना शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून विज वितरण कंपनीचे कर्मचारी खाजगी कंत्राटदार कडून ग्राहकांना सोबत जबरि करून मीटर बसवित आहे. वास्तविक ग्राहकांला लेखी पुर्वसुचना देणे आणि त्यांची संमत्ती घेऊनच स्मार्ट मिटर बसविण्याचे आदेश असताना हुकूमशाही पध्दतीने स्मार्ट मीटर बसविणे सुरु आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज वापराचे अचूक मोजमाप होत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी अनेक ग्राहकांनी अचानक वाढलेल्या वीज बिलांवर आक्षेप घेतला आहे. बिल कमी करून घेण्यासाठी नागरिकांना वारंवार महावितरण कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर डोकेदुखी ठरत आहे. स्मार्ट मीटरची सक्ती केल्यास परिणाम भोगावे लागले. असा इशारा देत उपकार्यकारी अभियंता श्याम येनगंठिवार यांना घेराव करून शिवसेनेने निवेदन सादर केले.
यावेळी न.पं. चे गटनेते प्रकाश मारोटकर, कृ.उ.बा.स. उपसभापती विलास पाटील सावदे यांच्यासह अन्य पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी