
परभणी, 29 जून (हिं.स.) : सोनपेठ येथील प्रतिष्ठित व्यापारी तथा औषध विक्रेते सुरेशकुमार लोढा यांची केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या तालुकाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी श्रीकांत मेहत्रे यांची निवड करण्यात आली आहे.
सोनपेठ तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीच्या निवडीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्वानुमते नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
या निवडीनुसार सचिवपदी गणेश मुंडे यांची निवड करण्यात आली असून शहराध्यक्षपदी लहुकुमार वाकणकर यांचीही फेरनिवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे सदस्यांनी स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
या बैठकीस असोसिएशनचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडविणे, संघटना अधिक बळकट करणे तसेच ग्राहकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा विश्वास व्यक्त केला.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis