

त्र्यंबकेश्वर , 29 जून (हिं.स.)। आषाढी वारीसाठी श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे पंढरपूर कडे टाळ मृदुंगाच्या गजरात प्रस्थानाला प्रारंभ झाला. तत्पूर्वी पालखी सोहळ्याची तयारी चालू असताना एक वाजता पावसाच्या मध्यम सरी देखील कोसळल्या आणि निसर्गाने शुभ संदेश देखील मिळाला. पालखी प्रस्थान प्रसंगी हजारापेक्षा जास्त वारकरी भाविक येथे उपस्थित होते.
पांडुरंगाचा अभंग झाल्यानंतर रथ संत निवृत्तीनाथ महाराज की जय या जयघोषात निघाला. यावेळी विश्वस्त पुजारी यांच्या हस्ते आरती झाली. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्यासह शेकडो मान्यवरांनी दर्शन घेत उपस्थिती लावली. यावेळी आखाडा परिषदेचे हरी गिरीमहाराज रवींद्रपुरीजी महाराज या साधू संतांनी देखील दर्शन घेतले.मंदिर चौकी माथा सुंदराबाई मठ भगवती चौक येथे रथ आला भगवती चौक येथे संत निवृत्तीनाथांचा चांदीचा रथ थांबवण्यात आला. जवळपास40 मिनिटे येथे रथे थांबलेला होता. भगवती चौकापासून पालखी पादुका आणि निवृत्तीनाथांची मूर्ती घेऊन गोदावरी कुशावर्त तिथे येथे महापूजा करण्यात आली.
नगरपालिकेच्या वतीने झालेल्या महापूजेत नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले. पालखी पुन्हा रथात ठेवण्यात आली. सुंदरा बाई मठ ते कुशावर्त तीर्थ या पूर्ण भागात दिंडीतील वारकरी टाळकरी कीर्तनकार पताकाधारी वारकरी तुळशीधारक महिला थांबून महापूजा करीत असताना दुसरीकडे अभंग म्हणत होते. त्यामुळे त्र्यंबक नगरी भक्ती रसात नाहून निघाली. महापूजा नंतर पुन्हा रथात पालखी ठेवण्यात आली व गोदावरी गंगेला उजवे घेत पालखी त्रंबकेश्वर मंदिरापुढे पोहोचली. मुख्य नाक्यावर संत गजानन महाराज मंदिर समोर येत नागरिकांनी पालखीला निरोप दिला. निरोप देण्यासाठी देखील स्थानिकांनी मोठी गर्दी केलेली होती. संत निवृत्तीनाथ मंदिर संस्थांचे अध्यक्ष सचिव पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त कर्मचारी स्वयंसेवक कार्यरत होते.
अध्यक्ष साळुंखे पुजारी गोसावी अग्रभाजी होते. त्रंबकेश्वर मधून सोबत जाण्यासाठी जवळपास ठीक ठिकाणीचे जवळपास 35 दिंड्यांचे प्रमुख दिंडी चालक त्रंबकेश्वर येथे उपस्थित होते. पालखीत काही घोडे होते त्यांना सुंदराबाई मठापासून पुढे मोठी गर्दी असल्याने रोखण्यात आले.यावरून विश्वस्त आणि घोडेवाले यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पालखी रथावर जास्त गर्दी नको याची सूचना करण्यात आली होती तरी देखील गर्दी दिसून येत होती. त्रंबकेश्वर नगरपालिकेकडून रस्त्यावर अतिक्रमणे काढण्यात आली होती अधिकारी लक्ष घालून होते. त्र्यंबकेश्वर पोलीस पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा चोख बंदोबस्त ठेवलेला होता. पालखीचा पहिला मुक्काम मी पंचायती महानिर्वाणी आखाडा प्रयोग तीर्थ येथे पडला येथे देखील नियोजन करण्यात आले होते. येथे पालखीचे स्वागत आखाड्याचे सचिव महंत रमेश गिरी महाराजांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV