रत्नागिरीत ज्येष्ठ नागरिकांना एसटीचे एनसीएमसी कार्ड काढण्याची सुविधा
रत्नागिरी, 29 जून (हिं.स.) । ज्येष्ठ नागरिकांना एसटीचे एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यातील सवलत मिळण्यासाठी १९९ र
रत्नागिरीत ज्येष्ठ नागरिकांना एसटीचे एनसीएमसी कार्ड काढण्याची सुविधा


रत्नागिरी, 29 जून (हिं.स.) । ज्येष्ठ नागरिकांना एसटीचे एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

एसटी महामंडळाने ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यातील सवलत मिळण्यासाठी १९९ रुपये भरून एनसीएमसी कार्ड असणे अनिवार्य केले आहे. ही कार्ड्स वितरण करण्यासाठी मे. इम्बिक्स कॅश टेक्नॉलॉजिस्ट या कंपनीची नेमणूक एसटी महामंडळाने केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना एसटी डेपोमध्ये न जाता ही कार्ड्स सुलभरीत्या मिळण्यासाठी रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाने येत्या रविवारी, दिनांक ५ जुलै २०२६ रोजी संघाच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात कॅम्प आयोजित केला आहे.

त्यावेळी कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी डी. डी. तराळे सकाळी १० ते दुपारी ४.३० या वेळेत कार्डची नोंदणी करतील. ज्या ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्ड काढावयाचे आहे. त्यांनी याचा लाभ घ्यावा. त्यांनी येताना आपले आधार कार्ड आणि मोबाइल फोन आणणे आवश्यक आहे. रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या कॅम्पचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन संघाच्या वतीने अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande