
कोल्हापूर, 03 जून (हिं.स.)। तावडे हॉटेल ते शिरोली जकात नाका दरम्यान कोल्हापुर शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावर असलेल्या पुलावरून कार ओढ्यात चाळीस फूट खाली कोसळली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले.
दुर्गाप्रसाद उर्फ दुर्गेश उवाप्प्पा ईटी (वय २५, कावळा नाका, मुळगाव लोकापूर बागलकोट) असे मृताचे नाव आहे. तर, अर्जुन रमेश चौगुले (गाडी मालक), रोहित मलीक माने, रोहित राजू जोंधळे हे तिघेजण गंभीर जखमी झाले.
अधिक माहिती अशी की, कारमधील हे चौघे तावडे हॉटेल चौकात खरेदीसाठी गेले होते. परत कोल्हापूरात जात असताना रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे कार लोखंडी पुलाला धडकून पुलावरून चाळीस फूट खाली ओढ्यात पडली. अपघातात दुर्गाप्रसाद उर्फ उवाप्पा ईटी हा जागीच ठार झाला. अर्जुन चौगुले (गाडी मालक), रोहित माने, रोहित जोंधळे हे तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना खासगी
अपघातानंतर तावडे हॉटेल ते कावळा नाका मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे, गांधीनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, शाहूपुरी पोलिस यांनी तात्काळ वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळावर नागरीक, वाहनधारक आणि बघ्यांची मोठी गर्दी होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar