“आपली परभणी, स्वच्छ परभणी” फाउंडेशनच्या मागण्यांवर मनपा आयुक्तांशी चर्चा
परभणी, 03 जून (हिं.स.) :‘आपली परभणी, स्वच्छ परभणी’ फाउंडेशनच्या वतीने बुधवारी परभणी महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांना विविध नागरी व स्वच्छताविषयक मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात शहरातील तुंबलेल्या नाल्यांची समस्या, सिंगल युज
‘आपली परभणी, स्वच्छ परभणी’ फाउंडेशनचे आयुक्तांना निवेदन :  तुंबलेल्या नाल्या, सिंगल युज प्लास्टिक, ई-वेस्ट व कचरा व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा


परभणी, 03 जून (हिं.स.) :‘आपली परभणी, स्वच्छ परभणी’ फाउंडेशनच्या वतीने बुधवारी परभणी महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांना विविध नागरी व स्वच्छताविषयक मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात शहरातील तुंबलेल्या नाल्यांची समस्या, सिंगल युज प्लास्टिकचा वाढता वापर, कचरा घंटागाडीचे अपुरे नियोजन, रस्त्यावरील पथदिव्यांची स्थिती तसेच ई-वेस्ट व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता. या सर्व विषयांवर आयुक्तांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी ‘आपली परभणी, स्वच्छ परभणी’ या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या सामाजिक व स्वच्छताविषयक कार्याची माहितीही प्रशासनास दिली. शहर अधिक स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक बनवण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राहूल आंबेगावकर, संस्थापक सदस्य पराग चौधरी, डॉ. संदीप कार्ले, डॉ. मयूर आष्टीकर, अशोक डुकरे, नंदू परांडकर, दत्ता कदम आणि दीपक कासंडे उपस्थित होते.

महानगरपालिका आयुक्तांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती फाउंडेशनकडून देण्यात आली.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande