मोटेगावकरांचे RCC क्लासेस तात्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
- सर्व पक्ष-संघटना विद्यार्थी-पालक यांच्या वतीने दि 6 जून रोजी RCC समोर निदर्शने आंदोलन लातूर, 03 जून (हिं.स.)। NEET 2026 पेपर फुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकर यांच्या RCC Classes वर कठोर कारवाई करण्यात यावी, परवाना रद्द करावा, विद्यार्थ्यांची फी
निवेदन


- सर्व पक्ष-संघटना विद्यार्थी-पालक यांच्या वतीने दि 6 जून रोजी RCC समोर निदर्शने आंदोलन

लातूर, 03 जून (हिं.स.)।

NEET 2026 पेपर फुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकर यांच्या RCC Classes वर कठोर कारवाई करण्यात यावी, परवाना रद्द करावा, विद्यार्थ्यांची फी परत करण्यात यावी तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी लातूर यांना समस्त लातूरकरांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

तसेच, पुढील दोन दिवसांत री नीट क्लासेस सोडून, नवीन अकरावी बारावी ऍडमिशन न घेणे सदरील प्रकरणाचे कायदेशीर कारवाईच निकाल लागेपर्यंत क्लासेस तात्काळ बंद करणे, मान्य न झाल्यास RCC Classes समोर लातूरमधील विविध विद्यार्थी संघटना, युवा संघटना, सामाजिक संघटना, सर्वपक्षीय पदाधिकारी, हजारो विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत भव्य निदर्शने करण्यात येतील, असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला.

यावेळी कुलदीप सूर्यवंशी, किरण चव्हाण, ॲड. राहुल मातोळकर, राणा चव्हाण, रोहित चवळे, अक्षय चवळे, राजाभाऊ चौगुले, नंदकिशोर साळुंखे, प्रशांत सुरवसे, धनराज शिंदे, बजरंग बप्पा चव्हाण, निलेश मांदळे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande