
बीड, 03 जून, (हिं.स.)। सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नातून एकाच दिवसात तीन गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मंजूर करण्यात यश आले आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील अर्चना पवार यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ७० हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. तसेच आंधळेवाडी येथील सुखदेव आंधळे यांच्या उपचारांसाठी ५० हजार रुपये, तर देसूर येथील संगीता भगत यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी ६० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
एकाच दिवसात तीन रुग्णांना उपचारासाठी आर्थिक आधार मिळाल्याने संबंधित कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व सहकार्यासाठी गरजू रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार सुरेश धस सातत्याने प्रयत्नशील असून, त्यांच्या माध्यमातून अनेक रुग्णांना वेळोवेळी आर्थिक मदतीचा आधार मिळत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis