सोलापूर : विजापूर रोड हत्तूर परिसरात भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू
सोलापूर, 03 जून (हिं.स.) : विजापूर रोडवरील हत्तूर परिसरात पहाटे घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रहमान मौला ढवळगी (वय 48) आणि राजू इमामसाब शेख (वय 35) हे प
Nff


सोलापूर, 03 जून (हिं.स.) : विजापूर रोडवरील हत्तूर परिसरात पहाटे घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रहमान मौला ढवळगी (वय 48) आणि राजू इमामसाब शेख (वय 35) हे पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास हत्तूर येथून सलगर वस्तीच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. याचवेळी समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रक (क्र. MH 13 EP 2340) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीने उपचारासाठी शासकीय छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनेची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande