‘चंद्रपूरचे प्रदुषण आणि नागरिकांची भूमिका’ विषयावर शुक्रवारी निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण
चंद्रपूर, 03 जून (हिं.स.)। गोंडवाना विद्यापीठाच्या चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण समितीतर्फे आयोजित निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवार, 5 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता रामनगर येथील ‘हॉटेल तिरुपती क्राउन’ येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘चंद्रपूरच
‘चंद्रपूरचे प्रदुषण आणि नागरिकांची भूमिका’ विषयावर शुक्रवारी निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण


चंद्रपूर, 03 जून (हिं.स.)।

गोंडवाना विद्यापीठाच्या चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण समितीतर्फे आयोजित निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवार, 5 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता रामनगर येथील ‘हॉटेल तिरुपती क्राउन’ येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘चंद्रपूरचे प्रदुषण आणि नागरिकांची भूमिका’ असा निबंधाचा विषय होता.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी वसुमना पंत, विशेष अतिथी चंद्रपूरचे प्रसिद्ध सल्लागार पल्मोनोलॉजिस्ट डॉ. सौरभ राजूकर उपस्थित राहणार आहेत. शिवाय गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

ही स्पर्धा 12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी, बारावीनंतरच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी अशा तीन गटात घेतली गेली. स्पर्धेचे पारितोषिकही तीन गटात वेगवेगळे दिले जाणार असून, पहिले पारितोषिक 5000 रूपये, द्वितीय 3000 व तृतीय पारितोषिक 2000 आणि प्रोत्साहन पारितोषिक 1000 रूपये असणार आहे. स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना यावेळी प्रमाणपत्र दिले जाईल.

या पर्यावरणपूरक उपक्रमाच्या बक्षीस वितरण सोहळ्याला विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यापीठाच्या सल्लागार परिषदचे सदस्य तथा प्रदूषण नियंत्रण समितीचे सदस्य संदीप पोशट्टीवार, समितीचे प्रस्तावक तथा सिनेट सदस्य संजय रामगिरवार, समन्वयक प्रा. निखील बांगडे, अधिष्ठाता डॉ. अशोक मिस्त्री आदींनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande