
चंद्रपूर, 03 जून (हिं.स.)।
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या वर्धा - चंद्रपूर - गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी स्वाती योगेश म्हसे पाटील यांची (मो. 9307181736) निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
निवडणूक निरीक्षक श्रीमती म्हसे पाटील ह्या उमेदवार /पक्ष किंवा मतदार यांना भेटण्यासाठी बकुळ, व्हीआयपी गेस्ट हाऊस, वन अकादमी, चंद्रपूर येथे सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत उपलब्ध राहतील, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव