लातूरमध्ये शेत रस्त्यासाठी शेतकऱ्याने अंगावर ओतून घेतले पेट्रोल
लातूर, 03 जून (हिं.स.)लातूर जिल्ह्यातील रेणापूर तहसील कार्यालयाचा बेजबाबदार आणि अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.रेणापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याला आपल्या शेतीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे त्याने रेणापूर तहसीलदारांकडे शेत रस्त्याची मा
शेतकरी


लातूर, 03 जून (हिं.स.)लातूर जिल्ह्यातील रेणापूर तहसील कार्यालयाचा बेजबाबदार आणि अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.रेणापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याला आपल्या शेतीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे त्याने रेणापूर तहसीलदारांकडे शेत रस्त्याची मागणी केली होती. मात्र, अनेक दिवस चकरा मारूनही त्याची मागणी पूर्ण झाली नाही. हतबल झालेल्या शेतकऱ्याने तहसीलदारांच्या समोरच अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला.सुदैवाने कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. मात्र या घटनेनंतर तहसीलदारांनी तात्काळ आदेश काढल्याचे व्हिडिओत दिसते.

पण इथे प्रश्न उपस्थित होतो की, प्रलंबित मागण्या किंवा हक्काच्या मागण्यांसाठी प्रत्येक शेतकऱ्याला अंगावर पेट्रोल-डिझेल ओतावे लागणार का? मगच तहसीलदार आदेश काढणार का?शासनाच्या यंत्रणांनी जनतेच्या समस्या गांभीर्याने घ्याव्यात आणि वेळेत निकाली काढाव्यात, अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधांसाठी एवढ्या टोकाच्या पावलांपर्यंत जावे लागणे हे प्रशासनासाठी लज्जास्पद आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande