लातूर - जागतिक सायकल दिनानिमित्त अहमदपूर शहरात सायकल रॅली
लातूर, 03 जून (हिं.स.)। 3 जून जागतिक सायकल दिनानिमित्त रोटरी क्लब व सायकलिस्ट क्लब अहमदपूर यांच्या वतीने अहमदपूर शहरात सामाजिक संदेश देत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. आजच्या धावपळीच्या व बैठे कामाच्या जमान्यात आणि होत असलेल्या इंधन टंचाई काळात स
सायकल रॅली


लातूर, 03 जून (हिं.स.)। 3 जून जागतिक सायकल दिनानिमित्त रोटरी क्लब व सायकलिस्ट क्लब अहमदपूर यांच्या वतीने अहमदपूर शहरात सामाजिक संदेश देत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

आजच्या धावपळीच्या व बैठे कामाच्या जमान्यात आणि होत असलेल्या इंधन टंचाई काळात सायकल चालवणे हा एक उत्तम पर्याय असून सायकल चालवण्याचे अनेक फायदे सांगणारे बॅनर्स हाती घेऊन सायकल चालवा इंधन वाचवा, सायकल चालवा निरोगी रहा, सायकल चालवा पर्यावरण वाचवा, सायकल चालवा प्रदूषण टाळा, अशा घोषणा देत महात्मा गांधी कॉलेज, बसवेश्वर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मुख्य रस्ता आझाद चौक, क्रांती चौक, बालाजी मंदिर रोड, महादेव मंदिर रोड, गवळी गल्ली, हनुमान मंदिर, हिना लॉज कॉर्नर, पोलीस स्टेशन, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, सावरकर चौक, बस स्टँड्, थोडगा रोड मार्गे बायपास रिंग रोड असा 21 किलोमीटर सायकल रॅली काढून शहरात सायकल जनजागृती करण्यात आली.

सायकल रॅलीचे शहरात जागोजागी स्वागत व अभिनंदन करण्यात आले अनेक नागरिकांनी आजच्या काळात सायकलचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे असे संबोधित केले या सायकल रॅलीत रोटरी क्लबचे अध्यक्ष कपिल बिरादार, सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष नवनाथ हांडे, यांच्यासह नामदेव बरुरे, भरत ईगे ,सूर्या साकोळे, कृष्णा काळे, लुल्ला भाई शेख, धनंजय तोकले, अरुण महाळंगकर ,वेदांत राठोड, अंबादास कोरनुळे या सायकल वीरांनी सहभाग घेतला.

(सायकल चालवणे आरोग्यासाठी वरदान) -नवनाथ हांडे -अध्यक्ष सायकलिस्ट क्लब)

-आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सायकल चालवणे हा सोपा व्यायाम आहे.

-दररोज अर्धा तास सायकल चालवण्याने हृदयाचे आरोग्य सुधारते.

-पायाचे स्नायू बळकट होतात व शरीराला ऊर्जा मिळते.

(पर्यावरण पूरक आणि प्रदूषण मुक्त सायकल प्रवास) कपिल बिरादार -अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ अहमदपूर

-ग्लोबल वार्मिंग आणि प्रदूषणाच्या काळात सायकल सर्वात सुरक्षित वाहन आहे.

-सायकल मधून कुठलाही धूर निघत नसल्यामुळे पर्यावरण रक्षण करण्यास सायकल खूप मदत करते.

-निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सायकल प्रवास काळाची गरज आहे.

-आज देशभरात होत असलेल्या इंधन टंचाई काळात सायकल अत्यंत उपयुक्त वाहन आहे. -त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत जाताना तसेच प्रत्येकाने आपले दुकान ऑफिस दहा किलोमीटर पर्यंत चा अंतर सायकलवर प्रवास करून इंधन बचत सोबतच प्रदूषण मुक्त भारत करण्यासाठी मदत करावे असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष कपिल बिरादार यांनी केले..

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande