मोबाईल ॲपद्वारे खत वितरण; शुक्रवारपासून सुरुवात गावपातळीपर्यंत माहिती पोहोचवा - जिल्हाधिकारी विनय गौडा
छत्रपती संभाजीनगर, 03 जून (हिं.स.)। राष्ट्रीय खत विक्री आराखड्यानुसार मोबाईल ॲपद्वारे खत नोंदणी व खरेदी करता येणार आहे. खत वितरण प्रणालीच्या या पथदर्शी प्रकल्पासाठी राज्यात छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. ये
मोबाईल ॲपद्वारे खत वितरण; शुक्रवारपासून सुरुवात गावपातळीपर्यंत माहिती पोहोचवा - जिल्हाधिकारी विनय गौडा


छत्रपती संभाजीनगर, 03 जून (हिं.स.)।

राष्ट्रीय खत विक्री आराखड्यानुसार मोबाईल ॲपद्वारे खत नोंदणी व खरेदी करता येणार आहे. खत वितरण प्रणालीच्या या पथदर्शी प्रकल्पासाठी राज्यात छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. येत्या शुक्रवार दि.५ जून पासून हा प्रकल्प सुरु होईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत या प्रणालीची माहिती पोहोचवावी,असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आज खतविक्री प्रणालीच्या अंमलबजावणी संदर्भात आढावा घेण्यात आला. तालुकास्तरीय सर्व यंत्रणांचा बैठकीत सहभाग होता. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व उपविभागीय कृषी अधिकारी , तहसिलदार आदी उपस्थित होते. तर तालुका कृषी अधिकारी दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शुक्रवार दि.५ पासून केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने अनुदानित खत वितरणाचा नॅशनल फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande