छत्रपती संभाजीनगर विभागात' दर्जेदार कृषि निविष्ठा वेळेत मिळण्यासाठी भरारी पथके सज्ज
छत्रपती संभाजीनगर, 03 जून (हिं.स.)। खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि औषधे योग्य दरात व वेळेत मिळण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांसाठी ''विभागीय भरारी पथके'' स्थापन करण्यात आली
छत्रपती संभाजीनगर विभागात' दर्जेदार कृषि निविष्ठा वेळेत मिळण्यासाठी भरारी पथके सज्ज


छत्रपती संभाजीनगर, 03 जून (हिं.स.)।

खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि औषधे योग्य दरात व वेळेत मिळण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांसाठी 'विभागीय भरारी पथके' स्थापन करण्यात आली असून, तंत्र अधिकारी श्री. ए. एल. काळुशे यांच्याकडे 'पथक प्रमुख' म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.पी. ए ताजने हे मोहीम अधिकारी, आणि एच. एस कातोरे. जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय हे पथकातील सदस्य असून एस. जी. बंडगर विभागीय गुणनियंत्रण य निरीक्षक हे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.कृषी निविष्ठांची साठेबाजी, जादा दराने विक्री किंवा कोणताही गैरप्रकार आढळल्यास संबंधित विक्रेत्यांचे परवाने तात्काळ रद्द केले जातील. तसेच गंभीर स्वरूपाच्या गैरव्यवहारांसाठी दोषींवर थेट फौजदारी (क्रिमिनल) गुन्हे दाखल करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.

तक्रार निवारण कक्ष स्थापन

कृषी निविष्ठांच्या गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने खरीप हंगामात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी विभाग स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे . ९४२१२३३२७० या मोबाइल क्रमांक तसेच १८००२३३४००० टोल फ्री संपर्क क्रमांकावर शेतकऱ्यांनी निविष्ठा उपलब्धता, अडचणी, तक्रारीबाबत संपर्क करावा . असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक श्री सुनील वानखेडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande