अमरावती : उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून गुन्हेगारी पार्श्वभूमी उघड
अमरावती, 03 जून (हिं.स.) : अमरावती विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या प्रमुख उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांमधून त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती समोर आली आहे. निवडणूक रिंगणातील पाच प्रमुख उमेदवारा
चार उमेदवार स्वच्छ प्रतिमेचे, विश्वकर्मांवर गुन्हे दाखल


अमरावती, 03 जून (हिं.स.) : अमरावती विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या प्रमुख उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांमधून त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती समोर आली आहे. निवडणूक रिंगणातील पाच प्रमुख उमेदवारांपैकी चार उमेदवारांनी स्वतःविरुद्ध कोणतेही गुन्हे दाखल नसल्याचे नमूद केले आहे, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. नीलेश विश्वकर्मा यांनी आपल्याविरुद्ध काही गुन्हे दाखल असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

भाजपचे माजी मंत्री प्रवीण पोटे-पाटील, काँग्रेसचे हर्षजीत देशमुख, अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया तसेच अन्य उमेदवारांनी प्रतिज्ञापत्राद्वारे स्वतःची प्रतिमा स्वच्छ असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या नावावर कोणतेही फौजदारी गुन्हे अथवा न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

दुसरीकडे, डॉ. नीलेश विश्वकर्मा यांनी आंदोलन, सार्वजनिक प्रश्नांवरील निदर्शने आणि विविध राजकीय कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर आपल्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याचे स्पष्ट केले आहे. ही प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट असल्याचेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांना विशेष महत्त्व असते. यामुळे मतदारांना उमेदवारांची वैयक्तिक, आर्थिक आणि कायदेशीर पार्श्वभूमी जाणून घेण्याची संधी मिळते. आर्थिक स्थिती, शैक्षणिक पात्रता आणि गुन्हेगारी नोंदी यांसारखी माहिती मतदानाच्या निर्णयावर प्रभाव टाकू शकते.

आगामी निवडणुकीत या खुलाशांचा मतदारांवर कितपत परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande