परभणीत निःशुल्क खो-खो प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
परभणी, 03 जून (हिं.स.) : जिल्ह्यातील नवतरुण खेळाडूंना आधुनिक जागतिक दर्जाचे तंत्रशुद्ध खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी तज्ञ प्रशिक्षकांमार्फत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खो-खो या खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी तज्ञ क्रीडा मार्गदर्शकाचे मार्गदर्शन लाभण
परभणीत निःशुल्क खो-खो प्रशिक्षण शिबीराचे आयोजन


परभणी, 03 जून (हिं.स.) : जिल्ह्यातील नवतरुण खेळाडूंना आधुनिक जागतिक दर्जाचे तंत्रशुद्ध खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी तज्ञ प्रशिक्षकांमार्फत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खो-खो या खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी तज्ञ क्रीडा मार्गदर्शकाचे मार्गदर्शन लाभणार आहे. हे प्रशिक्षण दि. ६ ते १५ जून २०२६ या कालावधीत देण्यात येणार आहे. प्रशिक्षण जिल्हा परिषद प्रशाला, नांदगाव येथे सकाळी ६.३० ते ८.३० वाजेपर्यत व श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी येथे संध्याकाळी ५.३० ते ७.३० वाजेपर्यत आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांनी केले आहे. अधिक माहीतीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती साखरे यांनी केले आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande