नाशिक - भाजपा कार्यालयात गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन
नाशिक, 03 जून (हिं.स.) - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि युतीचे शिल्पकार माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदिन वसंतस्मृती कार्यालयात भाजपा नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनिल केदार, सुजाता करजगीकर, बापु पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थित
नाशिक - भाजपा कार्यालयात गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन


नाशिक, 03 जून (हिं.स.) - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि युतीचे शिल्पकार माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदिन वसंतस्मृती कार्यालयात भाजपा नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनिल केदार, सुजाता करजगीकर, बापु पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

गोपीनाथ मुंडे आणि नाशिकचे नाते अतूट होते. ते प्रत्येक कार्यकर्त्याची आस्थेने विचारपूस करीत. आणीबाणीच्या काळात ते नाशिकच्या तुरुंगात होते. त्यामुळे नाशिकचे नेते आणि कार्यकर्ते त्यांना जवळचे वाटत. वकृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या गुणांच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच राजकारण आणि समाजकारणात आपल्या नावाचा आगळा ठसा उमटविला असे सांगून सुनिल केदार यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या जीवनाचे विविध पैलू उलगडून दाखविले. यावेळी सोनल दगडे, डॉ.वैशाली काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी महानगर सरचिटणीस सुनिल देसाई, काशिनाथ शिलेदार, प्रविण भाटे, प्रकाश चकोर, राजेंद्र मोरे, विनायक कस्तुरे, शंतनु शिंदे, ज्योती चव्हाणके, छाया देवांग, प्रशांत वाघ, मयुर गऊल, दिनेश भोसले, हेमंत शिंदे, बाबुराव पाटील, प्रदिप पाटील, गणेश आवनकर, दत्तात्रय नागरे, दिपक पाटील, अनिता भामरे, दिलीप देवांग, दयाराम पाटील, रफिक शेख, शादाब बागवान, सुनिल गोऱ्हे, दिपक देव, रिझवाना, मुनाफ शेख, मोहन आढाव, महेश भामरे, देवेंद्र चुंभळे, अभिनव यादव आदीसह मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande