
लातूर, 03 जून (हिं.स.)। माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री तथा लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपाचे नेते तथा लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी लातूर जिल्हा परिषद परिसरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि ग्रामीण विकासाच्या वाटचालीत अमूल्य योगदान देणारे, जनसामान्यांचे कार्यकुशल नेतृत्व आणि सामान्यांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारे नेते म्हणून स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांची निःस्वार्थ सेवा, जनहिताच्या कामाची वृत्ती आणि लोककल्याणाची बांधिलकी आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे आ. कराड यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश कराड यांनीही युवा मोर्चाच्या सहकाऱ्यांसह पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. तसेच अंबाजोगाई रोडवरील आ. कराड यांच्या भाजपा संवाद कार्यालयात अनेकांनी स्व. मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
या अभिवादन कार्यक्रमास युवानेते ऋषिकेश कराड, जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई संभाजी पाटील तळेगावकर, उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, महिला व बालकल्याण सभापती शिवकन्याताई गोडभरले, समाजकल्याण सभापती उत्तमराव माने, जिल्हा परिषद सदस्य महादेव साळुंके, रामलिंग शेरे, तानाजी बिराजदार, उमेश उमापुरे, कविता गुट्टे, तुळजाबाई लोंढे, छायाताई चिंचोलकर, रेणापूर पंचायत समितीचे उपसभापती शरद दरेकर, प्रा. रामेश्वर बद्दर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis