एकत्र यायचे असेल तर मातोश्रीवरती येऊन पश्चाताप व्यक्त करा - राऊतांचे शिंदे सेनेला खडे बोल
नाशिक, 03 जून (हिं.स.)। - दोन्हीही शिवसेना एकत्र यायचे असतील तर प्रथम मातोश्री वरती या आपला पश्चाताप व्यक्त करा मग काय असेल ते बोलू अशा शब्दांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला खडे बोल सुनावले आहे
एकत्र यायचे असेल तर मातोश्रीवरती येऊन पश्चाताप व्यक्त करा - राऊतांचे शिंदे सेनेला खडे बोल


नाशिक, 03 जून (हिं.स.)।

- दोन्हीही शिवसेना एकत्र यायचे असतील तर प्रथम मातोश्री वरती या आपला पश्चाताप व्यक्त करा मग काय असेल ते बोलू अशा शब्दांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला खडे बोल सुनावले आहे दरम्यान नासिक येथील माघारी प्रकरणावरती बोलताना ते म्हणाले की विधान परिषदेची निवडणूक म्हणजे घोडेबाजार झालेला आहे त्यामुळेच आम्ही ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले

यावरून मविआतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकेची झोड उठवली होती. तसेच माजी आमदार अनिल कदम आणि वसंत गिते यांनी अर्ज घेऊन देखील ते दाखल न केल्याने पक्षात असंतोष असल्याचे बोलले जात होते. त्यावर आज (बुधवारी) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधत भूमिका स्पष्ट केली.

यावेळी ते म्हणाले की,”महाविकास आघाडीने आपले उमेदवार उभे केले आहेत. खरी रणधुमाळी विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये असते,विधानपरिषद निवडणूक ही गोपनीय पद्धतीने होते.

नाशिक मतदारसंघात उमेदवारी अर्ज देण्याचा निर्णय प्रारंभी झाला होता. निवडणुका बिनविरोध करायच्या नाही हे आमच्या पक्षाचे मुख्य धोरण होते. त्यादृष्टीने आम्ही मातोश्रीवर तसेच मुंबईला आणि स्थानिक नेत्यांची चर्चा करूनच नाशिकबाबत अंतिम निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता नाशिकमध्ये काय होतंय, ते आपण पाहूयात, असे राऊत यांनी म्हटले.

शिंदे गट आमचा पहिला क्रमांकाचा शत्रू

विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात सध्या घोडेबाजार सुरू झाला आहे. नाशिकमध्ये उमेदवार दिला नाही म्हणजे आमची चूक नाही. मतांमध्ये मोठी तफावत असल्यामुळे कोणी इच्छुक पुढे आले नाहीत. हा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच घेण्यात आला आहे. आमच्याकडील मते कुणाला द्यायचे, याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. तुम्हाला निकालाच्या वेळी कळेलच की आम्ही कुणाला मतदान केले. पण, आमचा पहिला क्रमांकाचा शत्रू गटच आहे, असेही संजय राऊत म्हणाले

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी भाजपचे समोर असलेले आव्हान लक्षात घेता दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर या विधानावर बोलतांना राऊत म्हणाले की, दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी आधी मातोश्रीवर या आणि पश्चाताप व्यक्त करा. आधी त्यांना येऊ द्या, आल्यावर बघू, अशा कडक शब्दांत त्यांनी शिंदे गटाला सुनावले आहे. नुसती चर्चा करण्यात उपयोग नाही तर हिम्मत असेल तर निर्णय घ्या मग काय ते बोलू असे सांगून संजय राऊत यांनी मोठा इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा केवळ फसवणूक असतात. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे. प्रत्येक योजनेत सरकार लोकांची फसवणूक करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजपला मतदान करू नये. शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि मोदींच्या सभांना जाणे बंद केले, तर त्यांचे अनेक प्रश्न आपोआप सुटतील,” असे राऊतांनी म्हटले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande