रत्नागिरी : विधान परिषद निवडणुकीतून जुईली दळवी यांची माघार
रत्नागिरी, 3 जून (हिं.स.) । विधान परिषदेच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज जुईली महेंद्र दळवी यांनी आज मागे घेतला. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी : विधान परिषद निवडणुकीतून जुईली दळवी यांची माघार


रत्नागिरी, 3 जून (हिं.स.) ।

विधान परिषदेच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज जुईली महेंद्र दळवी यांनी आज मागे घेतला.

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी ही माहिती दिली. जुईली दळवी यावेळी स्वतः उपस्थित नव्हत्या. त्यांचे सूचक विघ्नेश विजय माळी यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. जुईली दळवी या शिवसेना शिंदे गटाचे अलिबागचेचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या आहेत. या मतदारसंघातून महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तरीही जुईली यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून अर्ज भरला होता; मात्र अखेर आज त्यांनी अर्ज मागे घेतला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande