सोलापूर : सीडीएस-67 पूर्व प्रशिक्षणासाठी नाशिक रोड येथे मोफत कोर्स
सोलापूर, 03 जून (हिं.स.) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी कम्बाईंन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड (नाशिक) येथे विश
सोलापूर : सीडीएस-67 पूर्व प्रशिक्षणासाठी नाशिक रोड येथे मोफत कोर्स


सोलापूर, 03 जून (हिं.स.) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी कम्बाईंन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस)

परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड (नाशिक) येथे विशेष प्रशिक्षण कोर्स आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी सीडीएस कोर्स क्र. 67 हा दिनांक 15 जून 2026 ते 28 ऑगस्ट 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी 10 जून 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुलाखतीस येताना उमेदवारांनी सैनिक कल्याण विभाग पुणे (डीएसडब्ल्यू) यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून सीडीेस-67 कोर्सचे प्रवेशपत्र व संबंधित परिशिष्टांची प्रिंट काढून ती पूर्ण भरून सोबत आणणे आवश्यक आहे.

या कोर्ससाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खालीलपैकी कोणतीही एक पात्रता पूर्ण केलेली असावी:

उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा

उमेदवाराने यूपीएससी, नवी दिल्ली मार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज केलेला असावा

ही माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने देण्यात आली आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande