छ.संभाजीनगर विभागातील 44 मोठ्या प्रकल्पात 33.82 टक्के, 81 मध्यम प्रकल्पात 30.94 टक्के पाणीसाठा
परभणी, 03 जून (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत 44 मोठ्या प्रकल्पात 33.11 टक्के, 81 मध्यम प्रकल्पात 30.94 टक्के तर 804 लघू प्रकल्पात केवळ 19.61 टक्के एवढाच जलसाठा उपलब्ध आहे, अशी माहिती राज्याच्या जलसंपदा विभागाने दिली. संभाजी नगर
छ.संभाजीनगर विभागातील 44 मोठ्या प्रकल्पात 33.82 टक्के, 81 मध्यम प्रकल्पात 30.94 टक्के पाणीसाठा


परभणी, 03 जून (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत 44 मोठ्या प्रकल्पात 33.11 टक्के, 81 मध्यम प्रकल्पात 30.94 टक्के तर 804 लघू प्रकल्पात केवळ 19.61 टक्के एवढाच जलसाठा उपलब्ध आहे, अशी माहिती राज्याच्या जलसंपदा विभागाने दिली. संभाजी नगर विभागांतर्गत 44 मोठ्या प्रकल्पात आजच्या स्थितीत एकूण उपयुक्त 1520.3 दशलक्ष घनमीटर, एकूण 2943.71 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. या उपयुक्त पाणीसाठ्याची आजची टक्केवारी 33.82 टक्के एवढी आहे. गतवर्षी या प्रकल्पात याच तारखेपर्यंत 33.11 टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठी उपलब्ध होता. तसेच या विभागांतर्गत 81 मध्यम प्रकल्पात एकूण उपयुक्त 256.94 दशलक्ष घनमीटर तर 420.18 दशलक्ष घनमीटर एकूण पाणीसाठा उपलब्ध असून उपयुक्त पाणी साठ्याची आजची टक्केवारी ही 24.32 तर गेल्यावर्षी या तारखेपर्यंत उपयुक्त पाण्याचा साठा 30.94 टक्के होता. या विभागांतर्गत 804 लघु प्रकल्पात एकूण 19.61 टक्के एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. या 804 लघु प्रकल्पात 374.38 टक्के उपयुक्त पाणीसाठा असा एकूण 618.35 टक्के एकूण पाणीसाठा उपलब्ध होता. आजच्या दिनांकापर्यंत 21.57 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर विभागातील एकूण 929 प्रकल्पांचा विचार करता, सध्या 7287.16 दशलक्ष घनमीटर उपयुक्त तर 9126 दशलक्ष घनमीटरच्या आसपास एकूण पाणीसाठा उपलब्ध आहे. विभागातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी 29.53 इतकी असून गतवर्षी याच तारखेला ती 29.58 टक्के होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande