
लातूर, 03 जून (हिं.स.)।
पोहण्याचा आनंद घेण्यासाठी विहिरीत मारलेली उडी एका २२ वर्षीय तरुण पदवीधरासाठी अखेरची ठरली. विहिरीच्या तळाशी असलेल्या गाळात फसल्याने पाच तास मृत्यूशी झुंज देऊन या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला.
रमजान बुऱ्हाण बोडूंगे (वय २२, रा. पाटोदा बु. ता. जळकोट) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो आईला एकुलता एक मुलगा होता. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण पाटोदा गावावर शोककळा पसरली आहे.
पोहायला गेला अन् घात झाला...
रमजान हा नुकताच बीएससी झालेला तरुण पाटोदा शिवारातील उत्तम केंद्रे यांच्या विहिरीत मित्रासोबत पोहायला गेला होता. दरम्यान, रमजानने विहिरीत उडी मारली, मात्र तो बराच वेळ वर आलाच नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis