जळगाव - पाचोऱ्याच्या दाम्पत्याचा बारडोली बस दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू
जळगाव, 03 जून, (हिं.स.) - सुरतच्या बारडोली येथे झालेल्या भीषण बस अपघातात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील प्रवासी दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पाचोरा येथील मधुकर यशवंत पाटील आणि त्यांच्या पत्नी अर्चना मधुकर पाटील यांचा या दुर्घटने
जळगाव - पाचोऱ्याच्या दाम्पत्याचा बारडोली बस दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू


जळगाव, 03 जून, (हिं.स.) - सुरतच्या बारडोली येथे झालेल्या भीषण बस अपघातात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील प्रवासी दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पाचोरा येथील मधुकर यशवंत पाटील आणि त्यांच्या पत्नी अर्चना मधुकर पाटील यांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. मात्र मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नसून डीएनए चाचणीनंतर होणार ओळख निश्चित होणार आहे. पाटील दाम्पत्य पाचोरा येथून सुरतकडे प्रवास करत होते. याच प्रवासादरम्यान झालेल्या भीषण अपघातानंतर बसने पेट घेतल्याने अनेक प्रवासी आगीत होरपळले. त्यामध्ये पाटील दाम्पत्याचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

या अपघाताची तीव्रता आणि आगीमुळे काही मृतदेहांची ओळख पटविण्यात प्रशासनास अडचणी येत आहेत. त्यामुळे मधुकर पाटील आणि अर्चना पाटील यांच्या मृतदेहांची अधिकृत ओळख डीएनए चाचणीद्वारे निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याआधी बस दुर्घटनेत जामनेर-सुरत मार्गावरील एसटी बसचे चालक घनश्याम बरकले यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. आता पाचोरा येथील दाम्पत्याच्या मृत्यूची भर पडल्याने जळगाव जिल्ह्यात शोक व्यक्त केला जात आहे. काही मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नसल्याने त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील आणखी काही प्रवाशांचा समावेश असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रशासनाकडून मृतांची ओळख पटविणे, नातेवाईकांशी संपर्क साधणे आणि मदतकार्य सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande