राज्यस्तरीय सेपक टकरा स्पर्धेसाठी परभणी जिल्ह्याचा संघ नागपूरकडे रवाना
परभणी, 03 जून (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य सेपक टकरा असोसिएशन व नागपूर जिल्हा सेपक टकरा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 36 वी वरिष्ठ व 27 वी ज्युनियर महाराष्ट्र राज्य सेपक टकरा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा 2026 चे आयोजन 4 ते 7 जून 2026 या कालावधीत मा
राज्यस्तरीय सेपक टकरा स्पर्धेसाठी परभणी जिल्ह्याचा संघ नागपूरकडे रवाना


परभणी, 03 जून (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य सेपक टकरा असोसिएशन व नागपूर जिल्हा सेपक टकरा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 36 वी वरिष्ठ व 27 वी ज्युनियर महाराष्ट्र राज्य सेपक टकरा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा 2026 चे आयोजन 4 ते 7 जून 2026 या कालावधीत मानकापूर इनडोअर स्टेडियम, विभागीय क्रीडा संकुल, नागपूर येथे आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेकरीता परभणी जिल्ह्याचा संघ रवाना झाला आहे.

या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी परभणी जिल्हा संघाचे पूर्व प्रशिक्षण शिबिर 29 मे ते 3 जून दरम्यान नूतन विद्यालय, सेलू येथे आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षण शिबिरानंतर जिल्ह्यातील खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ज्युनियर मुलींच्या संघात ओमश्री सोमनाथ गायकवाड, मानसी विजय कुलकर्णी, सुमित्रा मुकेश गव्हाडे, प्रगती प्रताप कदम, अनुष्का अमोल चव्हाण, सान्वी बाबासाहेब हेलसकर, श्रुतिका चंद्रकांत गटकळ, श्रावणी श्रीकांत दवे आणि मुक्ता यादवराव घोडके यांचा समावेश आहे.

तर ज्युनियर मुलांच्या संघात जितेश आनंद भिसे, सूरज अंबादास मोगल, कार्तिक दिनेश सातपुते, समर्थ आसाराम काकडे, यश गिरीश साडेगावकर, अभय हनुमान वाघ, संग्राम सुदीप कदम, चैतन्य केशवराव बोराडे, प्रसाद संजय महाले, कृष्णा सतीश गुंगे, प्रताप दत्ता पौळ, कार्तिक रामेश्वर लिंगे, अर्जुन पांडुरंग भिमाशंकर, आर्यन रामभाऊ गायके आणि पार्थ वैजनाथ दहिवाल यांची निवड करण्यात आली आहे.

वरिष्ठ मुलांच्या संघात पांडुरंग वेंकटी केंद्रे, रामेश्वर आनंदराव टेकाळे, निलेश सूर्यकांत बानाटे, मनीष मुरली बिस्वास, निलेश रावसाहेब काळंखे, श्रीसाई दत्तात्रय पोफळे, कृष्णा सुखदेव राठोड, विनोद गंगाधर राठोड, चेतन किशनराव मुक्तावार, गणेश किरणराव देवकर, सिद्दीक तारेक अन्वर, पृथ्वीराज चंदू वाघमोडे, जितेश आनंद भिसे आणि आर्यन रामभाऊ गायके यांचा समावेश आहे.

संघाला अनुराग आंबटी व संजय भुमकर हे प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना नूतन शिक्षण संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्रशासकीय अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, प्रभारी मुख्याध्यापक सुधीर जोशी, जिल्हा सचिव गणेश माळवे, जिल्हाध्यक्ष आ. राजेश विटेकर, राजेंद्र मुंढे, नितीन लोहट, प्रशांत नाईक, मोहम्मद इकबाल, सज्जन जैस्वाल, कैलास टेहरे, अब्दुल सत्तार, बाबासाहेब हेलसकर, राजेंद्र सोनवणे आणि मुकुंद डमरे यांनी शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande