
अमरावती, 03 जून (हिं.स.)।
चिखलदरा तालुक्यातील सलोना येथे प्रहार-शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शिवसेना आमदार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटना अधिक सक्षम करण्यासाठी गावागावात सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले. तसेच जनतेच्या विविध प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची भूमिका कायम ठेवत तळागाळातील नागरिकांपर्यंत पक्षाचे विचार आणि धोरणे पोहोचविण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. मेळाव्यात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. या मेळाव्यामुळे परिसरातील पक्ष संघटनात्मक बांधणीला नवसंजीवनी मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी