
पुणे, 03 जून (हिं.स.) पुणे महानगरपालिकेकडून गोखलेनगर येथील पाण्याच्या टाकीला मुख्य जलवाहिनीची जोडणी करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. या कामामुळे गुरुवार, ४ जून रोजी अनेक भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे, तर शुक्रवार, ५ जून रोजी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यास त्याचा परिणाम घरगुती कामे, शाळा, कार्यालये आणि दैनंदिन जीवनावर होतो. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ परिसर, लॉ कॉलेज रस्ता, बाणेर रस्ता, भोसलेनगर, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, पौड रस्ता, शीला विहार, भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी, सहवास सोसायटी परिसर, करिष्मा सोसायटी परिसर, डीपी रस्ता, मयूर कॉलनी, कर्वे रस्ता, दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत, भरतनगर, अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदिर, युको बँक कॉलनी, मंगेशकर रुग्णालय परिसर, हिमाली सोसायटी, वकिलनगर तसेच नवसह्याद्री आणि वारजेकडे जाणाऱ्या काही भागांतील पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु