नांदेडमध्ये अनेक ठाण्यांमध्ये खांदेपालट : पोलीस दलाची व्यापक पुनर्रचना
नांदेड, 03 जून (हिं.स.)जिल्ह्यातील पोलिस प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आला असून जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी, विविध पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमुळे अनेक पोलिस ठाण्यांमध्ये नवीन अध
नांदेडमध्ये अनेक ठाण्यांमध्ये खांदेपालट : पोलीस दलाची व्यापक पुनर्रचना


नांदेड, 03 जून (हिं.स.)जिल्ह्यातील पोलिस प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आला असून जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी, विविध पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमुळे अनेक पोलिस ठाण्यांमध्ये नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नवीन आदेशानुसार वजीराबाद पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस

निरीक्षक परमेश्वर कदम यांची बदली भोकर पोलिस ठाण्यात तर भोकरचे पोलिस निरीक्षक अजित कुमार यांना वजीराबाद, पोलिस निरीक्षक मारोती मुंडे यांची वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक कामेठवाड यांची नियंत्रण कक्षातून मुदखेड पोलिस ठाण्यात प्रभारी अधिकारी, अरविंद घोडके यांची कंधार पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली असून केंदे यांची हिमायतनगर पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande