शेतकऱ्याला शिवीगाळ महागात; सहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित
सोलापूर, 03 जून (हिं.स.)। दक्षिण सोलापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत असलेले अमोल नामदेव देवकर, सहाय्यक कृषी अधिकारी, कासेगाव यांना शेतकऱ्याशी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याच्या तक्रारीनंतर तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. मिळा
शेतकऱ्याला शिवीगाळ महागात; सहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित


सोलापूर, 03 जून (हिं.स.)। दक्षिण सोलापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत असलेले अमोल नामदेव देवकर, सहाय्यक कृषी अधिकारी, कासेगाव यांना शेतकऱ्याशी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याच्या तक्रारीनंतर तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कासेगाव येथील शेतकरी अजित जाधव यांना दूरध्वनीवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप देवकर यांच्यावर करण्यात आला होता. या घटनेबाबत कासेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच तसेच गावातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीसह २९ मे २०२६ रोजी कृषी विभागाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती.

तक्रारीची कृषी विभागाने तात्काळ दखल घेत विभागीय कृषी सहसंचालक, पुणे विभाग यांच्या कार्यालयामार्फत प्राथमिक चौकशी केली. चौकशीनंतर अमोल नामदेव देवकर यांना २९ मे २०२६ रोजी तात्काळ निलंबित करण्यात आले.

या प्रकरणी पुढील प्रशासकीय कार्यवाही नियमानुसार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande