शेतकऱ्यांना पेट्रोल, डिझेल पुरवठा करण्यासाठी संगमेश्वरच्या तहसीलदारांना निवेदन
रत्नागिरी, 3 जून (हिं.स.) । शेतकऱ्यांना त्यांच्या शेती अवजारांसाठी पेट्रोल व डिझेल पुरवठा सुरळीत करण्यासाठी संगमेश्वर पंचायत समिती सदस्य व उबाठा सेनेचे गटनेते विद्यासागर तांदळे यांनी संगमेश्वरच्या तहसीलदारांना निवेदन दिले. सध्या शेतीचा हंगाम सुरू
संगमेश्वरच्या तहसीलदारांना निवेदन


रत्नागिरी, 3 जून (हिं.स.) । शेतकऱ्यांना त्यांच्या शेती अवजारांसाठी पेट्रोल व डिझेल पुरवठा सुरळीत करण्यासाठी संगमेश्वर पंचायत समिती सदस्य व उबाठा सेनेचे गटनेते विद्यासागर तांदळे यांनी संगमेश्वरच्या तहसीलदारांना निवेदन दिले.

सध्या शेतीचा हंगाम सुरू होत असून पेट्रोल पंपांवर कॅन किंवा बाटलीतून इंधन देण्यास नकार दिला जात आहे. शेतीची अवजारे पेट्रोल पंपावर घेऊन येणे शक्य नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीसाठी इंधन पुरवठा झाला नाहीतर शेती धोक्यात येऊ शकते.

यासाठी श्री. तांदळे यांनी पेट्रोलियम ॲक्ट १९३४ मधील कलम ७, ८, व ९ नुसार शेतकऱ्यांना शेतीसाठी पेट्रोल, डिझेल देण्यासाठी संगमेश्वरच्या तहसीलदारांना निवेदन दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande