NEET पेपर लीक प्रकरणावर अमरावतीत ५ जूनला NSUI चा भव्य मशाल मोर्चा
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, NTA बरखास्त करण्याचा नारा; विद्यार्थी, पालक आणि सामाजिक संघटनांचा सहभाग अपेक्षित अमरावती, 03 जून (हिं.स.)। देशभरात गाजत असलेल्या NEET पेपर लीक घोटाळ्याच्या निषेधार्थ अमरावतीत ५ जून रोजी भव्य मशाल मोर्चाचे आ
NEET पेपर लीक प्रकरणावर अमरावतीत विद्यार्थ्यांचा संताप; ५ जूनला NSUI चा भव्य मशाल मोर्चा


शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, NTA बरखास्त करण्याचा नारा; विद्यार्थी, पालक आणि सामाजिक संघटनांचा सहभाग अपेक्षित

अमरावती, 03 जून (हिं.स.)।

देशभरात गाजत असलेल्या NEET पेपर लीक घोटाळ्याच्या निषेधार्थ अमरावतीत ५ जून रोजी भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या गंभीर प्रकरणाविरोधात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया अर्थात NSUI आक्रमक झाली असून देशभर आंदोलनांची मालिका सुरू आहे.NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखर यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष संकेत कुलट आणि अमरावती जिल्हाध्यक्ष सर्वेश खांडे यांच्या पुढाकाराने हा मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.हा मोर्चा शुक्रवार, ५ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अर्थात इर्विन चौक येथून सुरू होऊन जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत जाणार आहे.या आंदोलनातून केंद्र सरकारच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र निषेध नोंदवला जाणार असून विद्यार्थी, युवक, पालक आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि NTA बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, या मशाल मोर्चाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी NSUI चे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.NEET पेपर लीक प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, अमरावतीतील हा मशाल मोर्चा किती मोठा प्रतिसाद मिळवतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande