सोलापुरात प्रसिद्ध पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना सांगीतिक श्रद्धांजली
सोलापूर, 03 जून, (हिं.स.)। पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या अजरामर गाण्यांवर आधारित एका विशेष सांगीतिक श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाचनालयाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, संगीतप्रेमींसाठी ही एक सुवर्णसंधी अस
Simnsn


सोलापूर, 03 जून, (हिं.स.)। पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या अजरामर गाण्यांवर आधारित एका विशेष सांगीतिक श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाचनालयाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, संगीतप्रेमींसाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे.

सुमन कल्याणपूर यांनी आपल्या बहारदार आवाजाने मराठी आणि हिंदी संगीतविश्वावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या याच अथांग सांगीतिक प्रवासाला उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी हे सुमनजींची लोकप्रिय हिंदी-मराठी गाणी सादर करणार आहेत.

गुरुवार, ४ जून २०२६ रोजी सायंकाळी ठीक ६:०० वाजता टिळक सभागृह, हि.ने. वाचनालय येथे कर्यक्रम होणार आहे

सुमन कल्याणपूर यांच्या सुरेल गाण्यांचा आणि आठवणींचा हा प्रवास अनुभवण्यासाठी सर्व रसिक प्रेक्षकांनी आणि नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे सस्नेह आवाहन हि.ने. वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande