
लातूर, 03 जून (हिं.स.)। भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाद्वारे ‘खेलो इंडिया’ योजनेच्या ‘फिट इंडिया’ उपक्रमांतर्गत रविवार, ७ जून २०२६ रोजी लातूर शहरात ‘संडे ऑन सायकल’ या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये तंदुरुस्ती व नियमित व्यायामाचे महत्त्व रुजवण्यासाठी तसेच लठ्ठपणाशी लढण्यासाठी आयोजित केलेल्या या सायकल रॅलीचा मार्ग जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरू होऊन राजीव गांधी चौक, वाडा हॉटेल, पी.व्ही.आर. चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पुन्हा जिल्हा क्रीडा संकुल असा निश्चित करण्यात आला आहे.
तरी या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व क्रीडाप्रेमी, नागरिक, सायकलिंग क्लब, शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि खेळाडूंनी ७ जून २०२६ रोजी सकाळी ठीक ७ वाजता मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि या उपक्रमासाठी https://fitindia.gov.in/world-bicycle-day या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी, असे आवाहन लातूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis