पुणे - पीएलएस व एएसयुएसई बाबत तळेगाव येथे कार्यशाळेचे आयोजन
पुणे, 03 जून (हिं.स.)। नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (पीएलएस) व असंघटित क्षेत्रातील उद्यामांचे वार्षिक सर्वेक्षणाच्या (एएसयुएसई) अनुषंगाने ५ ते १० जून या कालावधीत राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आय
पुणे - पीएलएस व एएसयुएसई बाबत तळेगाव येथे कार्यशाळेचे आयोजन


पुणे, 03 जून (हिं.स.)। नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (पीएलएस) व असंघटित क्षेत्रातील उद्यामांचे वार्षिक सर्वेक्षणाच्या (एएसयुएसई) अनुषंगाने ५ ते १० जून या कालावधीत राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या उद्धाटनप्रसंगी विभागीय आयुक्त पुणे विभाग, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तसेच जिल्हाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाचे सह आयुक्त सुनील जाधव यांनी दिली आहे.

भारत सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, कोलकाता यांच्यामार्फत ‘पीएलएस’ व ‘एएसयुएसई’बाबत सर्वेक्षण माहे जानेवारी २०२६ पासून सुरु असून डिसेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणांचे क्षेत्रीय कामकाज अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या इप्सॉस रिसर्च प्रायव्हेट लि. मुंबई या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे, असेही जाधव यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande