तिरुपती-जालना विशेष गाड्यांच्या फेर्यांना मुदतवाढ
परभणी, 03 जून (हिं.स.)। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने तिरुपती-जालना दरम्यान चालविण्यात येणार्या विशेष गाड्यांच्या सेवेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या विद्यमान वेळापत्रक, थांबे, डब्यांची रचना व देखभाल व्
तिरुपती-जालना विशेष गाड्यांच्या फेर्यांना मुदतवाढ


परभणी, 03 जून (हिं.स.)।

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने तिरुपती-जालना दरम्यान चालविण्यात येणार्या विशेष गाड्यांच्या सेवेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या विद्यमान वेळापत्रक, थांबे, डब्यांची रचना व देखभाल व्यवस्थेनुसारच धावतील. तसेच या विशेष गाड्यांसाठी 1.3 पट विशेष भाडे लागू राहील, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली. गाडी क्रमांक 07814 जालना-तिरुपती विशेष (प्रत्येक गुरुवारी) यापूर्वी 25 जूनपर्यंत अधिसूचित होती. आता ही गाडी 2 जुलै ते 24 सप्टेंबर या कालावधीत आणखी 14 फेर्या चालविण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक 07815 तिरुपती-जालना विशेष (प्रत्येक शुक्रवारी) यापूर्वी 26 जूनपर्यंत अधिसूचित होती. या गाडीची सेवा 3 जुलै ते 25 सप्टेंबर या कालावधीत 14 अतिरिक्त फेर्यांसाठी वाढविण्यात आली आहे. या निर्णयामुळे मराठवाडा व आंध्र प्रदेशातील प्रवाशांना अतिरिक्त प्रवास सुविधा उपलब्ध होणार असून, वाढत्या प्रवासी मागणीची पूर्तता करण्यास मदत होईल. दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांनी या विशेष सेवेचा लाभ घ्यावा, तसेच प्रवासापूर्वी अधिकृत रेल्वे चौकशी प्रणालीद्वारे वेळापत्रक व आरक्षण स्थिती तपासून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande