सोलापूर - लाभार्थ्यांना हयात दाखले व UDID प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
सोलापूर, 03 जून (हिं.स) सांगोला तालुक्यात विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी हयात दाखले तसेच दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID (वैश्विक ओळखपत्र) प्रमाणपत्र वेळेत सादर करावे, असे आवाहन तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.संजय गांधी
सोलापूर - लाभार्थ्यांना हयात दाखले व UDID प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन


सोलापूर, 03 जून (हिं.स) सांगोला तालुक्यात विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी हयात दाखले तसेच दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID (वैश्विक ओळखपत्र) प्रमाणपत्र वेळेत सादर करावे, असे आवाहन तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.संजय गांधी निराधार अनुदान योजना,श्रवणबाळसेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी योजनेचा लाभ घेणाऱ्यालाभार्थ्यांनादरवर्षी 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीत हयात असल्याचे दाखले सादर करणे बंधनकारक आहे. मात्र सांगोला तालुक्यात अनेक लाभार्थ्यांनी अद्याप हयात दाखले जमा केलेले नाहीत. मुदतीत दाखले जमा न केल्यास संबंधितांचे अनुदान बंद होण्याची शक्यता आहे.शासनाने हयात दाखल्यासाठी सत्यापन ॲपद्वारे ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

लाभार्थी स्वतः, नातेवाईकांच्या मदतीने, ग्राम महसूल अधिकारी किंवा सेवा केंद्राच्या माध्यमातून हयात दाखले काढून गावातील ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे जमा करू शकतात.तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी UDID (वैश्विक ओळखपत्र) बंधनकारक करण्यात आले आहे. सांगोला तालुक्यात अनेक लाभार्थ्यांकडेअद्याप UDID कार्ड उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या लाभार्थ्यांकडे केवळ ऑफलाइन दिव्यांग प्रमाणपत्र असून UDID कार्ड नाही, त्यांनी 15 जूनपर्यंत स्वावलंबन पोर्टलवर अर्ज सादर करावा. तसेच 30 सप्टेंबरपूर्वी UDID कार्ड प्राप्त करून ते तहसील कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.याशिवाय, काही लाभार्थ्यांच्या UDID कार्ड व आधार कार्डवरीलजन्मतारखेमध्येतफावत आढळून आली असून संबंधित लाभार्थ्यांच्या याद्या ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यादीतील नाव असलेल्या लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात येऊन पडताळणी करून घ्यावी. तसेच ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही, त्यांनी ते तत्काळ लिंक करून घ्यावे, असेही आवाहन तहसीलदार सांगोला बाळूताई भागवत यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande