विप निवडणुकीत महायुतीतील मतभेद मिटविण्यासाठी उदय सामंतांच्या दौऱ्याला अपयश
आज माघारी चा शेवटचा दिवस नाशिक, 03 जून (हिं.स.) - विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील मित्र पक्षांमध्ये लढत होऊ नये यासाठी आता वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न सुरू झाले असून उदय सामंत यांनी घेतलेली पहिली बैठक अपयशी झाली आहे तर आज यावर चर्चा क
विप निवडणुकीत महायुतीतील मतभेद मिटविण्यासाठी उदय सामंतांच्या दौऱ्याला अपयश


आज माघारी चा शेवटचा दिवस

नाशिक, 03 जून (हिं.स.)

- विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील मित्र पक्षांमध्ये लढत होऊ नये यासाठी आता वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न सुरू झाले असून उदय सामंत यांनी घेतलेली पहिली बैठक अपयशी झाली आहे तर आज यावर चर्चा करण्यासाठी म्हणून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे नाशिक दौऱ्यावरती येणार आहेत त्यांच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ या गटासाठी निवडणूक होत आहे या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून कोणीही उमेदवार नसलं तरीही महायुतीकडून मात्र निश्चित उमेदवार कोण आणि महायुतीतील मतभेद समोर येणार का यावर चर्चा सुरू झालेले आहे सध्या तरी महायुतीकडून भाजपा प्रयत्न करत असलेल्या नाशिक विधान परिषद मतदार संघासाठी यश न आल्याने भाजपामध्ये नाराजीचा वातावरण आहे . ही जागा शिवसेना शिंदे गटाला गेल्यामुळे आता भाजपामधील या नाराजीचा विस्फोट होतो की तलवार मॅन होते हे आता पुढील काही तासांमध्ये समोर येणार आहे.

नाशिक विधान परिषदेच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाचे नरेंद्र दराडे हे उमेदवार निश्चित झाल्यानंतर आता या जागेसाठी म्हणून भाजपामध्येही हालचाली सुरू झालेले आहे महायुतीमध्येच मैत्रीत्वाची लढाई या निवडणुकीत लढण्याची तयारी सुरू झाली असून स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांचे भाऊ आणि पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे संचालक गोकुळ गीते हे विधान परिषदेची निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे मतदारांचे भेटीसाठी त्यांनी सुरू केलेले आहे सध्या तरी गोकुळ गीते हे कोणत्याच राजकीय पक्षांमध्ये सहभागी नाही त्यामुळे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार की अपक्ष निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत त्यांचे बंड थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत परंतु त्याला अजून पर्यंत यश आलेले नाही.

नाशिक विधान परिषद मतदार संघामध्ये महायुतीमध्ये उद्भवलेल्या पेज प्रसंगासाठी मार्ग काढावा याकरता राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत हे मंगळवारी रात्री उशिरा नाशिक मध्ये दाखल झाले शहरातील एका हॉटेलमध्ये त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली तसेच मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले परंतु यातील काही ठराविकच पदाधिकारी चर्चेसाठी गेले पण कोणताही निर्णय त्यामध्ये झालेला नाही उद्या सामाजिक यांनी गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत परंतु त्याला भाजपाकडून फारसा प्रतिसाद देण्यात आलेला नाही त्यामुळे आता शिवसेना शिंदे गट आपल्या स्तरावरती निवडणुकीची आखणी करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान उदय सामंत यांनी नाशिक मधील दौरा पूर्ण केल्यानंतर आज बुधवारी कुंभमेळा मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन हे नाशिक दौऱ्यावर येणार असल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले आहे याबाबत निश्चित दौरा कसा आहे हे जरी सांगितले नसले तरी देखील गिरीश महाजन हे जो उद्भवलेला महायुतीतील प्रसंग आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करतील असं पक्षाच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे परंतु गोकुळ गीते हे मुळातच कोणत्या पक्षात नाही त्यामुळे ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा ऐकणार का त्यातही गिरीश महाजन यांचं ऐकून गोकुळ गीते माघार घेणार का कारण आतापर्यंत गोकुळ गीते हे फक्त गणेश गीते हे भाजपा मध्ये आहे म्हणून त्यांच्यासाठी म्हणून काम करत असल्याचे गीते परिवाराच्यावतीने सांगण्यात आलेले आहे त्यामुळे भाजपाच्या या दबाव तंत्राचा गोकुळ गीते यांच्यावरती उपयोग होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अजूनच उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा दिवस म्हणजे गुरुवारचा दिवस असून गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यावयाचा आहे त्यानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande