अमरावती झेडपीला मिळाले नवीन कार्यकारी अभियंता
अमरावती, 03 जून (हिं.स.)| जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या दोन महत्त्वाच्या विभागांना नवीन विभागप्रमुख मिळाले आहेत. मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिल्पा पवार यांची महापालिकेत बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी एम. जी. टेळे यांची नि
झेडपीला मिळाले नवीन कार्यकारी अभियंता, कॅफो


अमरावती, 03 जून (हिं.स.)| जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या दोन महत्त्वाच्या विभागांना नवीन विभागप्रमुख मिळाले आहेत. मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिल्पा पवार यांची महापालिकेत बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी एम. जी. टेळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दीड वर्षांपासून रिक्त असलेल्या उपमुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी विकास पाटील यांची, तर बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता म्हणून नीला वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी अकोला जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता नीला वंजारी यांना पदस्थापना देण्यात आली आहे. नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे विविध योजनांच्या अंमलबजावणीतील कामकाजाला गती मिळण्याचे संकेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande